चैत्र नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव आहे. जो आई दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांची पूजा करुन देशभरात साजरा केला जातो. काही नागरिक नऊ दिवस उपवासही करतात. त्या दरम्यान नागरिक उपवासाच्या पदार्थ खातात. उपवासात सर्वाधिक जास्त खल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शिंगाडा. शिंगाडा किंवा शिंगाड्याच्या पीठाचा वापर हा साधारण उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. खास करून शिंगाड्याच्या पीठाच्या उपवासासाठी पुऱ्या तयार केल्या जातात. पण अशी एक बातमी समोर आली आहे की, त्यापासून तुम्ही सावधगिरी बाळगावी. नागपूरात शिंगाड्या पीठापासून तयार केलेले पदार्थ खाल्यामुळे 27 जणांना विषबाधा झाली आहे.
हेही वाचा : उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्यास मिळतील हे फायदे
नागपूरमधील कोराडी येथे 27 नागरिकांना शिंगड्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थ खाल्यामुळे विषबाधा झाली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बाधित नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी देखील महाशिवरात्री दरम्यान अशीच घटना घडली होती, उपवासाचे पीठ खाल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात कित्येकांना विषबाधेचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पिठाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला त्याचा भुर्दंड भरावा लागला होता.
हेही वाचा : सोन्याच्या भावाचा विक्रमी उच्चांक, 75 हजार रुपये तोळा झाली किंमत
काय आहेत लक्षणे ?
शिंगाडा पीठापासून बनवलेले अन्न पदार्थ खाल्याने नागरिकांना चक्कर येणे, डोके दुखी, डोळ्यांवर अंधारी येणे, उलट्या होणे, हाता पाया थरथरणे, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळत आहेत.
हेही वाचा : अंध मुलांचे पितृत्व स्वीकारणारा बाप माणूस
पॅकेट बंद पीठ विकत घेताना अशी घ्यावी काळजी...
बाजारातून पॅकेट बंद पीठ विकत घेताना ते व्यवस्थित पॅकिंग केलेले आहे की नाही हे तपासावे. पॅकेट बंद पीठाची एक्स्पायरी म्हणजेच मुदत संपली आहे का हेही पाहावे. पीठ जर व्यवस्थित पॅक केलेले नसेल तर त्यात आर्द्रता शिरते. पातळ प्लास्टिक पिशवी किंवा पोलिथिनच्या पिशवीमध्ये आर्द्रता शिरते. आर्द्रता शिरल्यास त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. ही बुरशी विषारी असू शकते. बुरशी लागलेले पीठ पोटात गेल्यावर इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. तेव्हा पीठ विकत घेताना ते नीट पॅक आहे की नाही हे तपासणे फार गरजेचे आहे.