Rajvardhini Chavan: वय फक्त 3 वर्ष, 4 महिने... सर केले तब्बल 100 गडकोट; राजवर्धिनीचा ऐतिहासिक पराक्रम!

बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने सह्याद्रीच्या दुर्गम वाटांवर शंभर गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण  केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

 Rajvardhini Chavan News:  सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांच्या बालवयात एका चिमुरडीने इतिहास रचला आहे. बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने आपला १०० गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कामगिरीनिमित्त पुण्याच्या ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर 'संकल्पसिद्धी सोहळा' अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

'हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे'; NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं वक्तव्य

चिमुकल्या पावलांनी पालथा घातला सह्याद्री 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांच्या बालवयात बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने सह्याद्रीच्या दुर्गम वाटांवर शंभर गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण  केला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पवित्र मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, त्याच रायरेश्वर मंदिरात श्री रायरेश्वराच्या अभिषेकाने या सोहळ्याची सांगता शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाली.

Advertisement

100 गड-कोट सर करण्याचा विक्रम!

​राजवर्धिनीचा हा दुर्गप्रवास अत्यंत रंजक आणि अचंबित करणारा आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या महिन्यात तिने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या गिर्यारोहण प्रवासाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर सिंहगड, शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, साल्हेर यांसह महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे गड-कोट तिने आपल्या बोबड्या बोलांनी आणि छोट्या पावलांनी सर केले.

Nashik Crime: दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! पत्नी, मुलाची निर्घृण हत्या, पतीने विष घेतलं

आज तीन वर्षे आणि चार महिन्यांच्या बालवयात तिने १०० गडांचा टप्पा पूर्ण करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये दोन वेळा तसेच 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये तिच्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या चिमुरडीच्या यशाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. राजवर्धिनीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.