राहुल वाघ, नाशिक:
Nashik Double Murder Case: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या वसंत विहार परिसरात कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून किरण हजारे या व्यक्तीने पत्नी अन् मुलाची निर्घृण हत्या केली. दोघांच्या हत्येनंतर आरोपीनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
'तू मरशील, माझे काय होणार?' कॅन्सर पीडित पतीला सोडून पत्नीने उरकले दुसरे लग्न; कोर्टाचे कडक पाऊल"
पत्नी, मुलाची हत्या.. आत्महत्येचा प्रयत्न
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकरोडच्या वसंत विहार परिसरात पतीने पत्नी अन् मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी हजारे असं मृत पत्नीचे नाव असून श्रेयस हजारे असे मुलाचे नाव आहे. पती- मुलाच्या हत्येनंतर पती किरण हजारे याने विष पिऊन स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
किरण हजारे आणि अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. ते गेल्या सात महिन्यांपासून अरिंगळे चाळीत वास्तव्यास होते. घटनेच्या आदल्या रात्री सासरच्या घरी जेवण करून ते परतले होते.सकाळी हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world