रिझवान शेख, प्रतिनिधी
Dengue Malaria Patients In Thane : ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसामुळे डासांचा उद्रेक वाढल्यानं डेंग्यु आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील चार महिन्यांमध्ये डेंग्युचे 405 आणि मलेरियाचे 621 रुग्ण आढळले आहेत.जुलै महिन्यात डेंग्युचे 156 रुग्ण, तर ऑगस्टमध्ये 243 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजारांवर रामबाण उपाय म्हणून ड्रॅगन फ्रुट,किवी,पपया फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या महिन्यात डेंग्युचे 67 रुग्ण व मलेरियाचे 191 रुग्ण सापडले आहेत.
डेंग्यू व मलेरियाच्या आजारांमुळे रुग्णांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स लवकर कमी होत असतात. यामुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या आजारांवर उपाय म्हणून किवी,ड्र्रॅगन फ्रुट आणि पपयाच्या पाल्याचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे मुख्य बाजारपेठेत फळांची मागणी वाढली आहे. परंतु, ठाणे बाजारपेठेत आवक वाढल्याने मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध असल्याने रुग्णांना धावपळ करावी लागत नाही, असं फळ विक्रेते धीरज गुप्ता यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> कोण आहे टीम इंडियाचा नंबर वन ODI कॅप्टन? रोहित शर्माचा नंबर वाचून थक्कच व्हाल
आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे.पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवणे.प्लास्टिक,बाटल्या,टायर यांचा योग्य वापर करणे.गटार,नाल्यांची नियमित सफाई,पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे,विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेतडास प्रतिबंधक क्रीम,लोशन वापरणे. डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, असं आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे.
डेंग्यू व मलेरिया या आजारांवर गुणकारी फळांचे भाव :
1. विदेशी ड्रॅगन फ्रुट (चायनीज) - 70 ते 80 रुपये नग
2. स्वदेशी ड्रॅगन फ्रुट - 50 ते 60 रुपये नग
3. पपई : 70 ते 80
4. किवी: 120 पॅकेट (3 नग),300 (5 नग)
ठाण्यात 4 महिन्यात 621 मलेरिया रुग्णांची नोंद
- जून : 91
- जुलै : 96
- ऑगस्ट: 243
- सप्टेंबर : 191
ठाण्यात 4 महिन्यात 405 डेंग्यू रुग्णांची नोंद :
- जून : 85
- जुलै : 156
- ऑगस्ट: 97
- सप्टेंबर : 67
नक्की वाचा >> 36 पैकी 36 गुण! DJ वाजताच नवरा-नवरीनं वरात गाजवली..पाहुण्यांसमोरच वेड्यासारखे नाचले, Video पाहून लोटपोट व्हाल