
Team India Captains ODI Ranking: भारतीय निवडकर्त्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत रोहित शर्माला वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटवलं. 2027 च्या वर्ल्डकपच्या अनुषंगाने भारताचा सलामीचा फलंदाज शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडेचा कर्णधार करण्यात आला आहे. मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्ऱॉफीनंतर ही भारताची पहिली वनडे मॅच आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलीय. त्यामुळे दोघेही एकमेव वनडे इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये सक्रीय आहेत. जून महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यात गिलने कॅप्टन्सीची कमान सांभाळली होती.आता गिलच्या खांद्यावर वनडेची कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्मा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
रोहित शर्माने वनडेचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या फायनलमध्ये खेळला होता. हा सामना भारताने जिंकला होता. रोहितने कर्णधार असताना भारताला 2023 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल वगळता इतर सर्व सामने जिंकवून दिले होते. त्याचवर्षी रोहितने आशिया कपही जिंकलं होतं. हे सर्व सामने रोहितच्या नेतृत्त्वात खेळवण्यात आले होते.
हे ही वाचा >> विराट-रोहित 2027 चा ODI वर्ल्डकप खेळणार का? गावस्करांचं खळबळजनक विधान, 'हा ऑस्ट्रेलिया दौरा.."
रोहितला 2021 च्या शेवटी वनडेचा प्रभारी कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पण रोहिता याआधीही 10 वनडे सामन्यांमध्ये कार्यवाहक कॅप्टन म्हणून खेळला होता. भारताने त्यापैकी 8 सामने जिंकले होते आणि दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामान करावा लागला होता. त्याने 56 वनडे सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली होती. यामध्ये भारताला 42 सामन्यांमध्ये विजय मिळाला होता.
कमीत कमी 10 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी करणाऱ्या कोणत्याही भारतीय वनडे कर्णधारांच्या विजय-पराभवाच्या सरासरीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. 41-12 विजयी-पराभवाच्या रेकॉर्ड सोबतच ही सरासरी 3.5 अशी आहे. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. त्याचं विजय-पराभवाची सरासरी 2.407 इतकी आहे. विराट आणि कोहली असे भारतीय कर्णधार आहेत, ज्यांनी कॅप्टन म्हणून हारलेल्या सामन्यांपेक्षा दुप्पटीने सामने जिंकले आहेत. तीन भारतीय कर्णधार - गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे आणि अनिल कुंबले यांनी कर्णधार म्हणून खेळलेल्या प्रत्येक वनडे सामन्यात विजय मिळवला आहे.
हे ही वाचा >> Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world