
Husband And Wife Funny Video Viral : नवरा-नवरीचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. पण लग्नसमारंभात जर कोणी भन्नाट डान्स केला, तर पाहुण्यांचंही मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही.अशातच खुद्द नवरा-नवरीच त्यांच्या लग्नात क्रेझी डान्स करत असेल, तर मग त्या कपलचे 36 पैकी 36 गुण जुळले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच एका कपलचा लग्नाच्या वरातीत धमाल डान्स करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. दिवाळी संपल्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. पण याआधीच सोशल मीडियावर नवरा-नवरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतंच एका नवरा-नवरीचा फनी व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, एक नवरा लग्नानंतर नवरीला जेव्हा घरी नेतो,तेव्हा घराजवळ ढोल ताशांचा आवाज ऐकून डान्स सुरु करतो. नवरा भन्नाट डान्स करत असल्याचं दिसताच नवरीही जबरदस्त डान्स स्टेप्स करत लग्नाच्या वरातीत धमाल करते. याचसोबत बॅकग्राऊंड म्यूजिकमध्ये पंजाबी गाना 'मित्रा' वाजत असल्याचं ऐकायला मिळत आहे. यामुळे नवऱ्याचा डान्स आणखी फनी होतो.
नक्की वाचा >> कोण आहे टीम इंडियाचा नंबर वन ODI कॅप्टन? रोहित शर्माचा नंबर वाचून थक्कच व्हाल
इथे पाहा नवरा-नवरीच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ
इसे कहते हैं 36 के 36 गुण मिलना पति पत्नी के 🤣😱😂 pic.twitter.com/3tJYRkGixM
— Nikita 🦋 (@Ks_Jaatni) October 3, 2025
नवरा त्याच्या धुंदीत डान्स करण्याचा आनंद लुटत असतो. त्याला पाहून नवरीही त्याचा साथ देत डान्स करणं सुरु करते. नवरीही वेगवेगळे ठुमके लगावत डान्स करते. आपल्या आजूबाजूला पाहण्यांची गर्दी आहे, याचंही भान त्यांना राहत नाही. पती-पत्नी दोघेही त्यांच्या मस्तीत दंग होतात. आनंदाचा पारावार न राहिलेल्या कपलचा हा जबरदस्त डान्स पाहून घरचे लोकंही सेलिब्रेशन करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ @Ks_Jaatni नावाच्या एक्स यूजरने ट्वीटरवर व्हायरल केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 52 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलंय, रब ने बना दी जोडी..तर अन्य एका यूजरने म्हटलं, याला म्हणतात 36 पैकी 36 गुण मिळणं.
नक्की वाचा >> Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world