'काय गाडी...काय डोंगर...'; पुण्यात 5 कोटींची कॅश जप्त, राऊतांचा शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा  

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची कॅश जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची कॅश जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कॅश इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये होती. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 

संजय राऊतांनी ट्विट करून  शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीतून खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय गाडी.. काय डोंगर.. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू किती हे खोके?  

ही गाडी पुणेहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीमध्ये अंदाजे चार ते पाच कोटींची कॅश असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ही गाडी पुण्याहून  कोल्हापुरच्या दिशेने प्रवास करत होती. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ ही गाडी पकडण्यात आली.

नक्की वाचा - महाविकास आघाडीचं घोडं कुठं अडलंय? काँग्रेस- शिवसेना UBT मध्ये कोणत्या जागांवर मतभेद ?

खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये पाच कोटी कॅश असल्याचा अंदाज आहे. पोलीस चौकीत पैशांची मोजणी सुरू आहे.