Nagpur News : नागपुर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यात शनिवारी पहाटे 4 वाजता एक धातूचा तुकडा घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आकाशातून हा तुकडा इमारतीवर पडला तेव्हा मोठा आवाज झाल्याच स्थानिक लोकांनी सांगितलं. आवाज येताच सर्व लोक घाबरून घराबाहेर पडले. कोसे लेआऊटमधील स्थानिक नागरिक अमेय बसवेश्वर यांचा घरावर धातूचा तुकडा पडल्यानं छतावरील भिंतीचा भागही तुटल्याची माहिती आहे.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा धातूचा तुकडा कशाचा आहे, हे अद्याप कळू न शकल्याने पुढील तपास सुरू केला आहे. हा तुकडा पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे. हा तुकडा 50 किलो वजनाचा असून, अंदाजे 10 ते 12 एमएम जाडीचा आणि 4 फूट लांब आहे. हा धातूचा तुकडा नेमका कशाचा आहे, याचा तपास सुरू आहे. आकाशातून पडलेला हा तुकडा नेमका कशाचा आहे हे तपासले जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.