जाहिरात

51 Ultra Luxury Homes: बाप रे! 1,40,00,00,000 रुपयांचा एक फ्लॅट, असे 51 फ्लॅट विकले, कोणी केली महागडी डील?

51 Ultra Luxury Homes Deal: ​शहरांच्या बाबतीत मुंबईने आपले वर्चस्व कायम राखले असून, ५,१०० कोटी रुपयांच्या ३५ व्यवहारांसह मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

51 Ultra Luxury Homes: बाप रे! 1,40,00,00,000 रुपयांचा एक फ्लॅट, असे 51 फ्लॅट विकले, कोणी केली महागडी डील?

51 Ultra Luxury Homes Sold In 2025 Worth : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी २०२५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात देशातील अति-श्रीमंतांनी (UHNIs) लक्झरी मालमत्ता खरेदी करण्यावर मोठा भर दिला असून, तब्बल ७,१८६ कोटी रुपयांचे ५१ आलिशान सौदे पूर्ण केले आहेत. 'झॅपकी' (Zapkey) या संस्थेच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, एका लक्झरी घराची सरासरी किंमत १४० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

२०२५ मधील सर्वात महागडा सौदा कोणी केला?

​२०२५ मधील सर्वात मोठा आणि चर्चेचा व्यवहार फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'यूएसव्ही'च्या (USV) अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांचा राहिला. त्यांनी मुंबईतील वरळी भागात ७३९ कोटी रुपयांना दोन सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट्स खरेदी केले. विशेष म्हणजे, प्रति चौरस फूट २.८३ लाख रुपये असा विक्रमी दर या व्यवहारासाठी मोजला गेला आहे.

Video Viral: शाळेच्या मैदानात रंगली डान्सबार गर्लची पार्टी, रात्रभर सुरू होतं अश्लील नृत्य अन् धिंगाणा

मुंबई पहिल्या क्रमांकावर..

​​शहरांच्या बाबतीत मुंबईने आपले वर्चस्व कायम राखले असून, ५,१०० कोटी रुपयांच्या ३५ व्यवहारांसह मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये १२ मोठे व्यवहार झाले, ज्यात प्रामुख्याने लुटियन्स झोनमधील बंगल्यांचा समावेश आहे. सुपर-लक्झरी विभागातील तेजी २०२६ मध्येही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून, आयपीओच्या माध्यमातून निर्माण झालेली संपत्ती आता मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्तेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

नक्की वाचा - Akola News: एकतर्फी प्रेम, 3 महिन्यापासून पाठलाग, हिंदू- मुस्लीम अँगल अन् भर रस्त्यातच त्याने तिचा...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com