Pandharpur News: आषाढीसाठी पंढरपुरात 5500 बसेस आणि 11 हजार कर्मचारी, सरकारने मात्र वारकऱ्यांपुढे ठेवली एक अट

आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने एक नवी योजना पुढे आणली आहे. 40 वारकरी एकत्र आले तर त्यांच्यासाठी विशेष एसटी बस महामंडळाकडून दिली जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
St Buses For Ashadhi Wari 2026

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pratap Sarnaik On Pandharpur Ashadhi Wari Buses : आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने एक नवी योजना पुढे आणली आहे. 40 वारकरी एकत्र आले तर त्यांच्यासाठी विशेष एसटी बस महामंडळाकडून दिली जाणार आहे. तर यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात चार बस स्थानके, 5500 बसेस आणि 11 हजार चालक आणि वाहक वारकऱ्यांच्या सेवेसाठी असतील.यंदा प्रथमच वारीमध्ये चांगले काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे प्रगती पुस्तकही तयार केले जाणार आहे.

प्रताप सरनाईकांनी संजय राऊतांचाही घेतला समाचार

याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पंढरपुरात येऊन एसटी बस स्थानकाची पाहणी करून महामंडळाच्या सर्व विभागांची बैठक घेतली आणि आषाढीचे नियोजन केले.तसेच वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्याबाबत महामंडळ प्रयत्नशील असल्याचेही सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईकांनी विरोधकांवर निशाणा साधत मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदार संजय राऊत सकाळी उठल्यापासूनच संशयाला खरी सुरुवात होते.विनायक राऊत यांच्याबद्दल तरी संजय राऊतांनी कुठलाही संशय व्यक्त करू नये. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये 'या' भागात पत्त्यांसारखी कोसळली इमारत! थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

"कौटुंबिक विषयावर बोलणे उचित नाही"

खासदार संजय राऊत सकाळी उठल्यापासूनच खरी संशयाला सुरुवात होत असते.त्यामुळे संजय राऊत यांनी आपले मित्र असणारे विनायक राऊत यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त करू नये.असे आपणास वाटते.हा राजकारणाचा भाग जरी असला तरी एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक विषयावर न बोलणे अधिक उचित आहे,अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात दिली आहे.माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेने आरोप केल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनी कौटुंबिक विषयावर बोलणे टाळले.मात्र ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत संशय व्यक्त केलेल्या संजय राऊत यांच्यावर मात्र टोलेबाजी केली. 

नक्की वाचा >> Pune News: बायकोने अनैतिक संबंधाबाबत विचारलं, नवऱ्याची सटकली अन् घरच पेटवलं..पुण्यात भयानक घडलं