
नागिंद मोरे, धुळे
Dhule News : फुगा फुगवताना 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील यशवंत नगरमधून समोर आली आहे. डिंपल मनोहर वानखेडे असं मृत मुलीचं नाव आहे. या घटनेची धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितूनुसार, धुळे शहरातील यशवंत नगर साक्री रोड येथे डिंपल आपल्या घराच्या अंगणात फुगा फुगवत असताना ही घटना घडली. फुगा फुगवत असताना तो अचानक फुटला आणि फुग्याचा तुकडा चिमुकलीच्या घशात अडकला.
(नक्की वाचा- Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO)
फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. डिंपलला त्रास होतोय हे कळताच तिच्या घरच्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
(नक्की वाचा - Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम)
अवघ्या आठ वर्षीय डिंपलच्या अशा मृत्यूने घराच्यांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.