जाहिरात

Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक गाडीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी जवळच्या बंगल्यातून एक बाउन्सर बाहेर आला आणि त्याने चालकाला चापट मारली. 

Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO
Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan Car Accident : बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला बेस्ट बसने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मुंबईतील जुहू परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातात कुणालाही दुखापत झालेले नाही. मात्र ऐश्वर्याच्या लक्झरी कारचं किरकोळ नुकसान झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी ऐश्वर्या गाडीत नव्हती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्हिडीओमध्ये दिसत आहे की बसच्या धडकेमुळे कारला कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. घटनेनतंर कार रस्त्यात उभी असून त्यामागे बस उभी असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर काही लोक जमलेले देखील दिसत आहेत. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर कार वेगाने निघून जात असल्याचे व्हिडीओत दिसून आले आहे. 

(नक्की वाचा - Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस जुहू डेपोमधून निघाली आणि अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचताच तिथे ऐश्वर्या रायच्या कारला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक गाडीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी जवळच्या बंगल्यातून एक बाउन्सर बाहेर आला आणि त्याने चालकाला चापट मारली. 

(नक्की वाचा-  बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी, ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!)

परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच  चालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि एक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यावर बाऊन्सरने बस चालकाची माफी मागितली. त्यानंतर बस सांताक्रूझ डेपोकडे निघून गेली. याप्रकरणी कोणतीही तक्रार किंवा एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असंही अधिकाऱ्याने पुढे सांगितले. 

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: