Jalna News : पंकजा मुंडेंकडे मागायला गेला दाद, पोलिसांनी घातली कंबरेत लाथ..! जालन्यातील धक्कादादायक प्रकार

Jalna News : मागायला गेला दाद.. पोलिसांनी घातली कंबरेत लाथ. हा धक्कादायक प्रकार जालन्यात स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jalna News : जालनामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna News : मागायला गेला दाद.. पोलिसांनी घातली कंबरेत लाथ. हा धक्कादायक प्रकार जालन्यात स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडला आहे. जालनामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून निवेनाच्या माध्यमातून दाद मागणाऱ्या आंदोलकांना ही लाथ खुद पोलिस अधिकऱ्यानेच घातली. त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण?

जालना शहरातील चौधरी कुटूंबातील सून ही विवाह नंतर फारकत न घेता निघून गेली. तिने दुसरं लग्न ही केलं याची तक्रार कुटूंबातील गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसात केली होती. मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरूनच चौधरी कुटुंबावर चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

( नक्की वाचा : PM Viksit Bharat Rojgar Yojana : देशभरातील तरुणांना कसे मिळणार 15 हजार? कुठे करणार अर्ज... वाचा सर्व माहिती )
 

याचं गुन्ह्यामुळे चौधरी कुटुंबानी गेल्या अनेक दिवसापासून सुनासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलन सुरु केलं आहे. मात्र कुणाचं दाद देत नसल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त  जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात मुंडे यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील आंदोलकांने पंकजा यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला.या वेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

अन त्याचंवेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतानाचं जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चक्क पाठीमागून येऊन ताब्यात घेतलेल्या आंदोलकाच्या कंबरेत पाठीमागून धावत येत फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे आंदोलकांप्रमाणेच सामान्यांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article