एसटी चालवताना चालकाला आली फिट, गाडीवरचा ताबा सुटला अन्...

टेंभुर्णी वरून कुर्डूवाडीला एसटी बस जात होती. बसमध्ये 35 ते 40 प्रवाशी प्रवास करत होते. त्यात जास्त करून महिला आणि वृद्ध होते.

Advertisement
Read Time: 2 mins
सोलापूर:

सोलापूरमध्ये एसटीचा अपघात झाला आहे. एसटी चालकाना गाडी चालवत असतानाच फिट आली. त्यावेळी त्याचे एसटीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याखाली शेतात पलटी झाली. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला. यावेळी गाडीत 35 ते 40 जण होते. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतातल्या मोकळ्या जागेत त्यांना बसवण्यात आले. त्यानंतर जखमींना कुर्डूवाडीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर एक विचित्र स्थितीत अपघात झाला आहे.  या महामार्गावर टेंभुर्णी वरून कुर्डूवाडीला एसटी बस जात होती. बसमध्ये 35 ते 40  प्रवाशी प्रवास करत होते. त्यात जास्त करून महिला आणि वृद्ध होते. प्रवास सुरू असतानाचा बसच्या चालकाला फिट आली. त्याला काही समजण्या आत त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी वेगात होती. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून बाजूला असलेल्या शेतात जाऊल उलटी झाली. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?

अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशी घाबरले. ज्याला जसे सुचेल तसे स्वताचा बचाव केला. एसटी बसमधून ते पटापट बाहेर पडले. त्यावेळी हायवे जवळ असलेल्या काहींनी मदतीसाठी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना शेतातील मोकळ्या जागेत बसवण्यात आले. त्यानंतर एसटीच्या चालकालाही बाहेर काढण्यात आले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. या अपघातात जवळपास तीस ते पस्तीस जण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले आहे.