Adhik maas 2026: अधिक मासात पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी प्रचंड गर्दी, 4 किलोमिटरपर्यंत लागल्या रांगा

दर्शनासाठी किती ही वेळ लागला तरी दर्शन घेणार असं भावीक म्हणणं होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी 

अधिक मासात पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी तोबा गर्दी उसळली आहे. विठ्ठल मंदिरापासून जवळपास चार किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्यातील शेवटचा वीकेंड आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सध्या विठ्ठलाची दर्शन रांग चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अधिक मासात विठ्ठल दर्शन घेणं हे भाविकांसाठी एक पर्वणी समजली जाते.  

गोपाळपूर रोडचे सर्व पत्रा शेड हे विठ्ठल भक्तांनी फुलून गेले आहेत. दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा कालावधी लागतोय. अशातच उन्हाचा पारा वाढत असताना भाविकांसाठी कुलर देखील दर्शन रांगेत लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना दर्शन रांगेत थंड पाणी व कुलरच्या थंडाव्यामुळे विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सुखकर होत आहे. विठ्ठल दर्शनासाठी भाविक यावेळी आतूर दिसले. त्यांना वाढत्या पाऱ्याची ही चिंता नव्हती. 

Advertisement

नक्की वाचा - PM Modi: 'एका वर्षात मोदींचं पंतप्रधान पद जाईल' राहुल गांधींनी केला दावा, कारण ही सांगितले

पुरुषोत्तम अधिक मासामुळे भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये आले आहेत. गोपाळपूरच्या पाच नंबरच्या पत्रा शेड त्यामुळे मोठी गर्दी दिसत होती. इथं पासून चार किमी अंतरावर विठ्ठलाचं दर्शन मिळणार होतं. दर्शन रांगेत भाविकांचा उत्साह ही दिसत होता. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी आले आहेत. काही भाविक सकाळी साडेसात वाजल्यापासून दर्शनासाठी उभे होते. दर्शनासाठी किती ही वेळ लागला तरी दर्शन घेणार असं भावीक म्हणणं होते. 

नक्की वाचा - LSG vs PBKS: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

अधिक मास आणि त्यात देव दर्शन भाविकांसाठी महत्वाचं समजलं जातं. पंढरपूरमध्ये सध्या पार 43 अंशापार गेला आहे. असं असताना ही  उन्हाचा काही त्रास होत नाही असं भाविकांनी सांगितलं. देव दर्शनासाठी कष्ठ हे करावेच लागतात. कष्ठ केले तरच देव भेटतो असं भाविक सांगत होते. मात्र भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर समितीने कुलरची सोय केली होती. त्यामुळे काही प्रमाणात का होईना भाविकांना दिलासा मिळत होता. 


Topics mentioned in this article