जाहिरात

PM Modi: 'एका वर्षात मोदींचं पंतप्रधान पद जाईल' राहुल गांधींनी केला दावा, कारण ही सांगितले

त्यानंतर आता मोदी हे पुढील एका वर्षात पंतप्रधानपदावरून पायउतार होतील असं वक्तव्य केलं आहे.

PM Modi: 'एका वर्षात मोदींचं पंतप्रधान पद जाईल' राहुल गांधींनी केला दावा, कारण ही सांगितले
  • देश सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना बचतीचे सल्ले दिले
  • पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ठिकाणी वाद आणि गॅस तुटवड्यामुळे गृहिणी त्रस्त झाल्या आहेत
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका वर्षात पंतप्रधान मोदी पदावरून पायउतार होतील असा दावा केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सध्या देश आर्थिक संकटात आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. सोने खरेदी पासून इंधन बचती पर्यंत त्यांनी सल्ले दिले. सध्या देशातील स्थिती ही स्फोटक बनत चालली आहे. पेट्रोल डिझेलसाठी अनेक ठिकाणी वाद होत आहेत. गॅस नसल्याने गृहीणी त्रस्त आहेत. अनेक हॉटेल्सला ही त्याचा फटका बसत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशात आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे एका वर्षात पंतप्रधानपदावरून पाय उतार होतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. 

राहुल गांधी यांची अलिकडच्या काळातील काही वक्तव्य चर्चेत आहेत. त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढतील असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसात तसचं झालं. पुढे त्यांनी देशावर मोठं आर्थिक संकट येणार आहे असं ही व्यक्तव्य केलं होतं. त्याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी ही देशाला संबोधीत करताना त्याचे संकेत दिले. त्यानंतर आता मोदी हे पुढील एका वर्षात पंतप्रधानपदावरून पायउतार होतील असं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचे पडसाद हे राजकीय वर्तूळात उमटत आहेत. 

नक्की वाचा - LSG vs PBKS: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

मोदींना पद का सोडावं लागेल याचे कारण ही राहुल यांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष यामुळे मोदींना पदावरून पायउतार व्हावं लागेल असं राहुल गांधी यांनी या बैठकीत सांगितलं आहे. बदलणाऱ्या परिस्थितीचा आणि तरूणाईचा वाढत्या असंतोषाचा परिणाम भारतीय राजकारणावर होणार असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. या बैठकीतच काही नेत्यांनी 'मुस्लिम' ऐवजी 'अल्पसंख्याक' हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला होता. 

नक्की वाचा - Tiger attack: वाघ चिडतायत,आक्रमक होतायत! वन्यजीव तज्ज्ञांचे धक्कादायक निरिक्षण, 'त्या' घटनेनंतर चिंता वाढली

यावर राहुल गांधी यांनी अल्पसंख्यांक शब्द म्हणायला विरोध केला. त्यांनी सांगितले की, “मुस्लीम म्हणण्यासाठी घाबरण्याची गरज नाही.  अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समाजाला उघडपणे पाठिंबा दिला पाहिजे असं ते म्हणाले. काँग्रेस हिंदू, दलित, उच्चवर्णीय, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन अशा सर्वांच्या हक्कांसाठी आवाज उठवेल.” या सर्वां सोबत काँग्रेस उभी आहे असं त्यांनी ठाम पणे सांगितले. कोणाला ही घाबरण्याची गरज नाही असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com