मविआ सरकारमध्येही मंत्रिपद, शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री; आदिती तटकरे पुन्हा शपथविधीच्या मंचावर

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघात जिंकून आमदार झाल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

2023 मध्ये एकनाथ शिंदेंच्या सरकारमधील एकमेव महिला मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आज त्या नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतील. 

नक्की वाचा - कट्टर शिवसैनिक, प्रस्थापितांना हादरा ते मंत्रिपद; दादा भुसेंची यशस्वी 'राज'नीती

आदिती तटकरे या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघात जिंकून आमदार झाल्या होत्या. आदिती या मूळच्या रोहा शहरातील आहेत. त्यांनी 26 नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही मंत्री राहिल्या आहेत. 

आदिती तटकरे यांच्यावर महिला आणि बाल विकास कल्याण खात्याची जबाबदारी असून लाडकी बहीण योजनेमुळे त्यांची राज्यात मोठी चर्चा होती.  

कसा आहे राजकीय प्रवास?
आदिती 2017 ते 2019 पर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्या 30 डिसेंबर, 2019 पासून 29 जून 2022 पर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होत्या, तटकरे यांनी पर्यटन, सूचना आणि जनसंपर्क, कायदा आणि न्यायपालिकासह अनेक विभागांचं नेतृत्व केलं आहे. 

शिंदे सरकारमधील एकमेव महिला मंत्री...
शिंदेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिंदेंनी मंत्रिपरिषदेचा विस्तार केला होता. त्यावेळी अनेक वरिष्ठ महिला प्रतिनिधींच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यात कोणालाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही. आता आदिती तटकरे या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री झाल्या आहेत. 

Advertisement