मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घातलेली साद आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तात्काळ दिलेला प्रतिसाद यानंतर शिवसेना- मनसेच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या. यावरुनच आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत आदित्य ठाकरे?
"उद्धव साहेबांनी युतीसाठी त्यांना प्रतिसद दिला होता. जे महाराष्ट हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्यासोबत आहे. सेटिंगचे राजकारण नाही आम्ही स्वच्छ दिलाने एकत्र यायचं ठरवतोय. कोण टाळी देते, कोण साथ देत आहे. हे सुरू राहणार आहे. महाराष्ट्र हितासाठी कुणीही आले तरी एकत्र येऊ..," असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर पुन्हा एकदा सूचक संकेत दिले आहेत.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाबाबतही महत्त्वाचे विधान केले. "या पुस्तकाचे अनावरण होऊ द्या, मी अद्याप पुस्तक वाचले नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी जेलमध्ये काळ काढला. जे जेलच्या भीतीने पळाले ते सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. भाजपने आमचा पक्ष फोडला, ही नीच प्रवृतीआहे. हे घाणेरडे राजकारण भाजप करत आहे," अशी टीका आदित्य ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
संभाजीनगरच्या मोर्चात खैरे-दानवे संघर्ष
दरम्यान, पाणी प्रश्नावरून आज छत्रपती संभाजीनगर शहरात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खैरे वाद पाहायला मिळाला. मोर्चात आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे एकत्र चालत असताना चंद्रकांत खैरे यांनी आपलाच वेगळाच रथ काढत मोर्चा पुढे नेला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन खैरे विरुद्ध दानवे असा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अशात खैरेंनी आपलं वेगळंच रथ पुढे नेल्याने पुन्हा एकदा याची चर्चा होऊ लागली आहे.