प्रसूतीनंतर 5 तासाने उपलब्ध झाली रुग्णवाहिका, KDMC मध्ये चाललंय काय?

त्यांच्या बाळाची प्रकृती ठिक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. तर वैदेही यांचीही तब्बेत बिघडली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा इथल्या रुक्मीणी प्लाझा या प्रसूती गृहात एका महिलेची प्रसूती झाली. प्रसुतीनंतर तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मुंबईला हलवणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णवाहिका हवी होती. पण त्या महिलेला रुग्णवाहीका वेळेत भेटली नाही. तब्बल पाच तास तिला रुग्णवाहीकेची वाट पहावी लागील. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासना विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी वैदेही मुंडे या दाखल झाल्या होत्या. त्यांची तिथे प्रसूती झाली. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. मात्र त्यांच्या बाळाची प्रकृती ठिक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. तर वैदेही यांचीही तब्बेत बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णाहिका नव्हती. ती मागवण्यात आली.  

ट्रेंडिंग बातमी - 'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?

रुग्णावाहीकेच वाट मुंडे कुटुंब होतं. एक तास दोन तास असे तब्बल पाच तास वाट पाहील्यानंतर त्यांना रुग्णवाहीका उपलब्ध झाली. डॉक्टरांनी प्रसुती वेळी चुक केल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे. अशा वेळी जर महिलेच्या जीवाचं काही झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं असा प्रश्नही नातेवाईकांनी केला आहे. दरम्या या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रुग्णालयात धडकले होते. त्यांनी रूग्ण सेवेच्या गलथान पणाचा निषेध केला. शिवाय ही यंत्रणा सुधारली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही दिला. शिंदे गटानंतर ठाकरे गटाने ही या घटनेचा निषेध केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'अरे आपली लायकी नाही' जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करत नवनीत राणा संतापल्या

या प्रकरणी आता कल्याण डोंबिवली महापालिकेने ही आपली बाजू मांडली आहे. महापालिकेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास विलंब झाल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितलं. मात्र संबधित महिलेला मुंबईतील रुग्णालयात पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अन्य एका महिलेची प्रसूती देखील करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या 14 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. आणखीन 9 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकर 9 रुग्णवाहिका दाखल होतील. त्यामुळे रुग्णवाहिकांची एकूण संख्या 23 इतकी होईल असं सांगत त्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement