जाहिरात

'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?

केंद्राने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत काय पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी आता कट्टर हिंदूत्वाच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. आधी त्यांनी बाबरी मस्जिद ज्या दिवशी पाडली त्या दिवशी त्यांनी मस्जिद पाडणाऱ्यांचे जाहीर कौतूक केले होते. त्याला समाजवादी पार्टीने विरोध केल्यानंतरही ठाकरेंनी भूमीका बदलली नव्हती. आता ठाकरेंनी बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारा विरोधात आवाज उठवला आहे. शिवाय मुंबईतल्या मंदिराला पाडण्याबाबत नोटीस आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरले आहे. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी आणि भाजपलाच काही प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र त्यात महत्वाच्या विषयांना बगल दिली जात आहे. केंद्र सरकार देशातल्या प्रश्नाबाबत गंभीर नाही असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बांगलादेशात हिंदूवर हल्ले सुरू आहेत. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहे. मंदिरं तोडली जात आहे. इस्कॉन मंदिर जाळलं गेलं. मंदिराच्या प्रमुखांना अटक केली जात आहे. असा स्थितीत आपले विश्वगुरू हे अत्याचार का पाहात बसले आहेत असा सवाल ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता केला. मोदींनी जसं एका फोनवर युक्रेन रशिया युद्ध थांबवलं तसा ते बांगलादेशबाबत निर्णय का घेत नाही असा प्रश्नही त्यांन ही त्यांनी या निमित्ताने केला.    

ट्रेंडिंग बातमी - 'शरद पवार, अजित पवार एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईंचे सर्वात मोठे विधान

इथं येवून  बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगे करून काही उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती काढून काय उपयोग. बांगलादेशात धमक दाखवा असे आव्हान ठाकरे यांनी दिलं. या प्रश्नाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण मोदींनी भेट नाकारली. मोदींनी जगभर फिरायचं असतं. भाषणं द्यायची असतात. त्यामुळे त्यांना हिंदूंवर अत्याचार होत आहेत हे लक्षात आले नसेल. जसं मणिपूरचे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.    

ट्रेंडिंग बातमी - Allu Arjun Arrested : संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण, हैदराबादमधून सुपरस्टार अल्लु अर्जुनला अटक

त्यामुळे केंद्राने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत काय पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केवळ निवडणुकीं पुरता हिंदू हिंदू करता आणि नंतर त्यांनाच वाऱ्यावर सोडता असंही ते म्हणाले. एक नेशन एक इलेक्शन हे नंतर बघ आधी हिंदूंवरिल अत्याचाराबाबत बोला. हिंदू फक्त तुम्हाला तुमच्या मतांपुरता मर्यादीत वाटतो का असा प्रश्नही त्यांनी केला. भाजपला केवळ हिंदूंची मतं हवी आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं त्यांना काही पडलेलं नाही असंही ते यावेळी म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - मंत्रिपदासाठी अनेकांची फिल्डिंग; पण एकनाथ शिंदेंनी 4 निकष ठरवले; कशी होणार नेत्यांची परीक्षा?

मुंबईतलं 80 वर्ष जुनं मंदिर पाडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दादर इथं हनुमानाचं मंदिर आहे. ते हमालांना बांधलं आहे. हे मंदिर पाडण्यासाठी नोटीत पाठवण्यात आली आहे. शिवाय नवी मुंबईत मंदिराचं आरक्षण असलेल्या जागेवर सिडकोचा डोळा आहे. त्यामुळे भाजप सरकार आता गप्प का आहे. हिंदूत्व हे भाजपचं मतां पुरतं आहे. त्यांना भयभित करायचं. त्यांची मतं घ्यायची. निवडून आल्यानंतर त्यांचीच मंदिर पाडायची असा उद्योग सुरू आहे. त्यामुळे आता तुमचे हिंदूत्व  कुठे गेलं आहे. एक है तो सेफ है  पण इथं मंदिरच सेफ कुठे आहेत. त्यामुळे लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर भाजप आणि मोदींनी बांगलादेशबाबत बोलावं असे आव्हान ठाकरे यांनी दिलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com