जाहिरात

'अरे आपली लायकी नाही' जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करत नवनीत राणा संतापल्या

बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असताना देशभरात अनेक रॅली निघाल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला.

'अरे आपली लायकी नाही' जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करत नवनीत राणा संतापल्या
अमरावती:

माजी खासदार नवनीत राणा या जेव्हा संधी मिळेल त्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. शिवाय ठाकरेंचे हिंदूत्व कसे खोटे आहे हे सांगायला ही त्या विसरत नाहीत. त्यात बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. याला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंची थेट लायकी काढण्यापर्यंत त्या गेल्या. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जनाब असा केला आहे. राणा यांच्या या टीकेनंतर आता ठाकरे गटाकडून  काय प्रतिक्रीया उमटते हे पहावे लागणार आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दादर येथील हनुमान मंदिर पाडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या 80 वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. त्याला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हनुमान मंदिराबाबत आता तुम्हाला प्रेम उफाळून आलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना हिंदूवर अत्याचार होत होते. आम्ही हनुमान चालीसाचे पठण केलं म्हणून जेलमध्ये टाकलं गेलं. देशद्रोहा सारखी कलमं लावली गेली. हनुमान चालीसा बोललो म्हणून 14 दिवस जेलमध्ये होतो याची आठवण राणा यांनी करून दिली.

ट्रेंडिंग बातमी - 'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?

त्यावेळी जनाब उद्धव ठाकरे यांना हिंदूत्व आठवलं नाही का? उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मोठा दणका मिळाला. त्यामुळेच त्यांचं आता हिंदूत्व जागं झालं आहे.  बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यावरून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न केले आहेत. शिवाय टीका ही केली आहे. याचाही समाचार राणा यांनी घेतला. ठाकरे यांची पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची लायकी नाही असं त्या थेट बोलल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'शरद पवार, अजित पवार एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईंचे सर्वात मोठे विधान

बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असताना देशभरात अनेक रॅली निघाल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. या रॅलीत मोठ्या प्रमाणात जनता सहभागी होत आहे. लहान मुलंही सहभागी होत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. नवनीत राणा यांनी ज्या शब्दात ठाकरेंवर टीका केली आहे ते पाहात येणाऱ्या काळात राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com