जाहिरात

Manikrao Kokate News: राजीनामा द्यावाच लागेल! रम्मी माहित नाही म्हणणाऱ्या कोकाटेंचा नवा VIDEO समोर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ ट्वीट केला आहे. राजीनामा द्यावाच लागेल, असंही ते म्हणालेत. 

Manikrao Kokate News: राजीनामा द्यावाच लागेल! रम्मी माहित नाही म्हणणाऱ्या कोकाटेंचा नवा VIDEO समोर

Manikrao Kokate New Video Playing Online Game: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मी रम्मी खेळलोच नाही, असा दावा करत राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. या सगळ्या वादावर त्यांनी पत्रकार परिषद घेत माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ ट्वीट केला आहे. 24 सेकंदाच्या या नव्या व्हिडिओमध्ये सभागृहाचे कामकाज सुरु असल्याचेही ऐकू येत आहे. 

काय म्हणालेत रोहित पवार?

"राजीनामा_द्यावाच_लागेल. सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना' या चर्चेत रस नसावा," अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

तसेच "मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर' अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती," असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान, या वादावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी सकाळीच पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. मला रमी खेळता येत नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. ज्यामुळे माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Manikrao Kokate: राजीनामा देण्यासारखं घडलं काय? कृषिमंत्री कोकाटेंचा सवाल, बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार

 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com