
सौरभ वाघमारे, सोलापूर: बार्शी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. बार्शीच्या रानमाळावर चाळीस वर्षापासून सिताफळातील विकसनशील क्रांती करण्याचं काम कृतिशील शेतकरी नवनाथ कसपटे यांनी केली आहे.. गेल्या 40 वर्षात नवनाथ कसपटे यांनी सिताफळ उत्पादक पिकात एक वेगळीच प्रजात विकसित केली आहे.. त्यांनी एन एम के 1 गोल्डन सिताफळाची प्रजात विकसित करण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागला. एन एम के 1 गोल्डन प्रजातीचा पेटंट नवनाथ कसपटे यांच्या नावावर 2019 साली करण्यात आला. नवनाथ कसपटे यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात सिताफळ उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.. कसपटे यांनी सिताफळाच्या विविध प्रजाती निर्माण करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सिताफळ हे साता समुद्र पार पोचवलं आहे.
( नक्की वाचा : Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग )
सिताफळ हे जंगली पीक म्हणून ओळखलं जातं. नवनाथ कसपटे यांनी सीताफळाच्या तब्बल तीन हजार निरीक्षणासाठी रोपांची लागवड केली.. त्यातून त्यांनी गेल्या दहा ते बारा वर्षात चाळीस रोपांची निरीक्षण करून त्यातील चार जाती विकसित केल्या आहेत. त्यांनी आपल्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून आर्वी, सुंदर, समृद्धी आणि सिताराम अशा सिताफळाच्या प्रजाती विकसित करून आपल्या 65 एकर परिसरात त्याची लागवड केली आहे.
या जातींचे वैशिष्ट्य पाहिला गेलं तर सिताफळ आणि रामफळ यांचे मिश्रित असणार सिताफळ तयार करण्याचं कसब कसपटे यांनी दाखवला आहे. कसपटे यांच्या संपूर्ण शेतात सुमारे नऊ हजार हून अधिक सीताफळ रोपांची लागवड केली आहे.. पारंपरिक सीताफळात जिथे 70 पेक्षा जास्त बी असतात, तिथे या प्रजातीमध्ये केवळ 15 बी असतात. यातूनच नवीन प्रजात विकसित केली. नवनाथ कसपटे यांनी एनएमके 1 गोल्डन वाणाची लागवड केल्यापासून सर्वसामान्य शेतकर्यांना करोडोंची रोपे दिली आहे. संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूही वाणाला मागणी वाढत आहे.
(नक्की वाचा : Exclusive : वर्धापनदिनीच वाढलं ठाकरेंचं टेन्शन! खासदार आमच्या संपर्कात, लवकरच... केंद्रीय मंत्र्यांचा दावा )
देशात होत असलेल्या सिताफळ लागवडीमध्ये तब्बल 80 टक्के वाटा हा एनएमके-1 गोल्डन या वाणाचा आहे. असा हा महत्त्वपूर्ण वाण विकसित केल्याबद्दल डॉ. नवनाथ कसपटे यांना ही डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ कसपटे यांचा शिक्षण पाहिला गेला तर अकरावी पर्यंत त्यांचे शिक्षण त्यांनी घेतल्या आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world