
प्रसाद शिंदे, अहिल्यानगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी तसेच मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवाँधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडत आहेत. अशातच अहिल्यानगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. घराचा पोर्च कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगरमधील सारसनगरमध्ये परिसरात घडली आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शहरातील सारसनगर परिसरात संदीपनगर येथे पावसामुळे गंभीर हानी झाली आहे. सारसनगर येथील तनवी केदार रासने (वय 20) हिचा घराचा पोर्च कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची अवस्था दयनीय झाली आहे. विशेषतः जुन्या आणि कमकुवत घरांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. सारसनगर परिसरातील झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे मोठे बंधू सचिनभाऊ जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक प्रशासनाणे या ठिकाणी पोहचून माहिती घेतली आहे.
नक्की वाचा - Pune Crime : 15 लाख, अश्लील फोटो अन् हुंडा; महिला अत्याचाराच्या आणखी एक घटनेनं पुणे हादरलं!
दरम्यान, सततच्या पावसामुळे शहरातील रस्ते, नाले तुंबले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने कमकुवत इमारतींची तत्काळ तपासणी करून नगर शहरात योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world