जाहिरात

Pune Crime : 15 लाख, अश्लील फोटो अन् हुंडा; महिला अत्याचाराच्या आणखी एक घटनेनं पुणे हादरलं!

पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यासाठी तब्बल 21 दिवस लावले आणि महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा फक्त ‘यांना सहकार्य करा’ अस सांगण्यात आलं, असा आरोप पीडितेने केला आहे.

Pune Crime : 15 लाख, अश्लील फोटो अन् हुंडा; महिला अत्याचाराच्या आणखी एक घटनेनं पुणे हादरलं!

पुण्यातील महिला अत्याचाराचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका 26 वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून 15 लाख रुपये उकळले आणि तिच्या सोबत जबरदस्ती करत तिचे अश्लील फोटो व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शामनाथ गंभीरे याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत पैसे घेतले. तो पीडितेला शरीरसंबंधाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देत होता, अशीही माहिती समोर आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यासाठी तब्बल 21 दिवस लावले आणि महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा फक्त ‘यांना सहकार्य करा' अस सांगण्यात आलं, असा पीडितेचा आरोप आहे. आरोपीचे वडील हे पुणे पोलिसात कार्यरत होते अशीही माहिती समोर येत आहे.   

Vaishnavi Hagawane: हसरा चेहरा, नराधम पतीसाठी खास उखाणा, वैष्णवी हगवणेचा लग्नातील VIDEO

नक्की वाचा - Vaishnavi Hagawane: हसरा चेहरा, नराधम पतीसाठी खास उखाणा, वैष्णवी हगवणेचा लग्नातील VIDEO

काय आहे प्रकरण? 

26 वर्षीय महिला एका जिममध्ये कामाला होती. यावेळी शामनाथ गंभीरे नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली. त्यादरम्यान पीडितेच्या आईला  काही आजार झाला होता. तेव्हा तिने आरोपी कडून डाइट प्लान घेतला होता आणि यातून त्यांची ओळख वाढली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर जवळपास वर्षभर पीडित महिला लग्नाची वाट पाहत होती. पण आरोपी आणि त्याचं कुटुंब लग्नास तयार नव्हतं. या दरम्यान, पीडित महिलेकडून आणि तिच्या घरच्यांकडून आरोपीने या ना त्या कारणाने 15 लाख रुपये घेतले. 

त्यानंतर पीडित महिलेचे वडील आजारी होते. त्यावेळी पीडितेने आरोपीकडून स्वत:चे पैसे परत देण्यास सांगितलं. मात्र आरोपी आणि त्याच्या घरच्यांनी हुंड्यात पैसे दिले आहेत अस समजून ते विसरून जा असे सांगून घरातून हाकलून दिले. पीडित महिलेच्या वडिलांच्या निधनानंतर आरोपी शामनाथ गंभीरे तिच्या घरी आला आणि पुन्हा जबरदस्ती करत फोटो व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊ लागला. 

महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली असता तब्बल 21 दिवसांनंतर FIR दाखल करण्यात आली आणि त्यामध्ये 15 लाख आणि  हुंड्यांचा संदर्भ नमूद करण्यात आला नाही. पीडित महिलेने जानेवारी महिन्यात महिला आयोगाकडे धाव घेतली. 2 ते 3 महिन्यानंतर त्यांचा अर्ज पोलीस ठाण्यात गेला तेव्हा पोलिसांनी सांगितले की कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे म्हणून काही करू शकत नाही 

पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपी पीडित महिलेने केला आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा त्या पीडीत महिलेला त्रास देण्याच्या हेतूने आरोपी वेगवेगळ्या नंबर वरून तिला मेसेज करीत होता. त्याशिवाय पीडित महिलेच्या घराच्या खाली रात्रंदिवस अनोळखी व्यक्ती उभी असते. या बाबतचा अर्ज पोलिसांना देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस करवाई करण्यात आलेली नाही, असा पीडितेचा आरोप आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com