Ahilyanagar News: पारनेर हादरलं! कीर्तनकार महाराजाचं नराधम कृत्य; अमानुष छळ करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Ahilyanagar News: पारनेरमधील ढवळपुरी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत महाराज थोरात यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि अमानुष छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसाद शिंदे, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने आणि कीर्तनकाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अध्यात्माचा बुरखा पांघरून एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम कीर्तनकाराचा खरा चेहरा समोर आला आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष *यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज)* याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी आठवीत असल्यापासून, म्हणजेच 2021 पासून हा अत्याचाराचा सिलसिला सुरू होता.

Advertisement

घरोब्याच्या संबंधाचा गैरफायदा

आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे, पीडितेचा भाऊ आरोपीच्याच संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याच विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा तो तिच्यावर बळजबरीने अत्याचार करत असे.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा)

10  मार्चचा अमानुष थरार

10 मार्च 2026 रोजी या क्रूरतेने कळस गाठला. आरोपीने पीडितेला फोन करून घरी बोलावले. तिने नकार दिला असता तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी त्याच्या घरी गेली असता, त्याने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने आणि चापटीने बेदम मारहाण केली. नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम केली आणि पीडितेच्या शरीरावर त्याचे चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

पीडितेने हिंमत दाखवून दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी पहाटे 4 वाजता आरोपी यशवंत थोरातला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर विविध कलमान्वये गंभीर दुखापत आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा-  Iran vs America: पुन्हा 9/11 सारख्या हल्ल्याचा कट? इराणने अमेरिकेला केले सावध; एपस्टिन कनेक्शनचा उल्लेख)

जिल्ह्यात संतापाची लाट

धर्माच्या नावाखाली वावरणाऱ्या एका कीर्तनकाराने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article