जाहिरात

Accident News: मोठा अपघात! 4-5 गाड्या एकमेकांवर धडकल्या, प्रवासी जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News: मोठा अपघात! 4-5 गाड्या एकमेकांवर धडकल्या, प्रवासी जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी

सुरज कसबे, पुणे:

Ahilyanagar Pune Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वीच नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर इनोव्हा कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर- पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अनेक गाड्यांचा अपघात, महामार्गावर वाहतूक कोंडी

समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील कासारी फाटा परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पिकअप, टेम्पो, ‘किया' कार आणि काही दुचाक्यांचे नुकसान झाले. फुलांनी भरलेल्या पिकअपला पाठीमागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने पिकअप पलटी झाला आणि टेम्पो रस्त्याकडील टपरी शेडमध्ये घुसला. या धडकेत समोरून येणाऱ्या कारला व काही दुचाकींनाही फटका बसला.

Vasai News: वसई विरार पालिकेची धडक कारवाई! डमी रुग्ण पाठवली, डॉ. खान फसले, नेमकं काय घडलं?

अपघातात काही महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केली आहेत.

डंपरच्या धडकेत नातवासह आजोबांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी सोलापूर बार्शी महामार्गावरही दुचाकी आणि डंपरचा मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्या नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय पाखरे असे मृत आजोबांचे नाव तर शंभू पाखरे असे मृत चिमुकल्या नातवाचे नाव आहे. शंभू आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखवण्यासाठी दत्तात्रय पाखरे हे दुचाकीवर निघाले होते, यावेळीच ही दुर्दैवी घटना घडली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com