शरद पवारांच्या सावलीत शेवटपर्यंत मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी; राजकारणातील मातब्बर काका-पुतण्याची कहाणी

अजित पवार यांनी जिथून राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात केली तिथूनच बारामतीमध्ये त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अजित पवार ने शरद पवार की उंगली पकड़ कर महाराष्ट्र की राजनीति में कदम रखा और कद्दावर नेता बने.
  • लेकिन वे केंद्र की राजनीति में सक्रिय हो पाते उससे पहले ही उन्हें MP की सीट चाचा शरद पवार के लिए छोड़नी पड़ी.
  • 2004 में राज्य की गठबंधन सरकार में सबसे बड़ी पार्टी बनने के बाद भी शरद पवार ने अजित पवार को CM नहीं बनने दिया.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

महाराष्ट्रातील जबरदस्त, कणखर नेते अजित पवार यांचं बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या अनेक ओळखी आहेत. कोणी त्यांना दबंग म्हणे तर कोणी त्यांच्या स्पष्टवक्तपणेचं कौतुक करीत असे. त्यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकरत वेगळा मार्ग निवडला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता.

अजित पवार यांनी जिथून राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात केली तिथूनच बारामतीमध्ये त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. याच बारामतीच्या रस्त्यांवरुन  त्यांच्या मोटारसायकलवरुन ते लोकांना भेटायला जात असत. ते लोकांमध्ये रमत. त्यांचा जनमानसातील संपर्क हा तगडा होता. त्यांचा जन्म बारामतीपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळाली प्रवरा नावाच्या गावात झाला आणि त्यांनी तिथेच शिक्षण घेतलं.

अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव यांचे पुत्र . अनंतराव यांनी वडिलांशी झालेल्या भांडणानंतर घर सोडलं आणि त्यांनी चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्यासाठी मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये असिस्टंट  सिनेमेटोग्राफर म्हणून काम सुरू केलं. अजित पवार शाळेत असतानाच अनंतरावांचे निधन झाले आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी अजित पवारांवर आली. काही काळासाठी, अजित पवार त्यांच्या मामाच्या घरी राहत होते.

भ्रष्टाचाराचं प्रकरण...

अजित पवार एकामागून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकू लागले. त्यांच्यावरील सर्वात मोठा आरोप म्हणजे ७०,००० कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा. हा १९९९ ते २००९ दरम्यान घडला, जेव्हा अजित पवारांवर सिंचन विभागाची जबाबदारी होती. 

Advertisement