- अजित पवार ने शरद पवार की उंगली पकड़ कर महाराष्ट्र की राजनीति में कदम रखा और कद्दावर नेता बने.
- लेकिन वे केंद्र की राजनीति में सक्रिय हो पाते उससे पहले ही उन्हें MP की सीट चाचा शरद पवार के लिए छोड़नी पड़ी.
- 2004 में राज्य की गठबंधन सरकार में सबसे बड़ी पार्टी बनने के बाद भी शरद पवार ने अजित पवार को CM नहीं बनने दिया.
महाराष्ट्रातील जबरदस्त, कणखर नेते अजित पवार यांचं बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या अनेक ओळखी आहेत. कोणी त्यांना दबंग म्हणे तर कोणी त्यांच्या स्पष्टवक्तपणेचं कौतुक करीत असे. त्यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकरत वेगळा मार्ग निवडला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
अजित पवार यांनी जिथून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली तिथूनच बारामतीमध्ये त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. याच बारामतीच्या रस्त्यांवरुन त्यांच्या मोटारसायकलवरुन ते लोकांना भेटायला जात असत. ते लोकांमध्ये रमत. त्यांचा जनमानसातील संपर्क हा तगडा होता. त्यांचा जन्म बारामतीपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळाली प्रवरा नावाच्या गावात झाला आणि त्यांनी तिथेच शिक्षण घेतलं.
अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव यांचे पुत्र . अनंतराव यांनी वडिलांशी झालेल्या भांडणानंतर घर सोडलं आणि त्यांनी चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्यासाठी मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये असिस्टंट सिनेमेटोग्राफर म्हणून काम सुरू केलं. अजित पवार शाळेत असतानाच अनंतरावांचे निधन झाले आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी अजित पवारांवर आली. काही काळासाठी, अजित पवार त्यांच्या मामाच्या घरी राहत होते.
काकांचं बोट पकडून राजकारणाचे घेतले धडे...
त्या काळात शरद पवारांचा राज्याच्या राजकारणात उदय होत होता. त्यांचं बोट धरून अजित पवारांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांसह अनेक राजकारणी साखर सहकारी संस्थांमधून राजकारणात आले. त्याचवेळी अजित पवार यांनीही तेथूनच राजकारणात एन्ट्री घेतली. १९८२ मध्ये त्यांची एका साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९९१ मध्ये अजित पवार काँग्रेसच्या तिकिटावर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. ज्यामुळे ते महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकारण्यांपैकी एक बनले. केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांना त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी त्यांची संसदीय जागा सोडावी लागली. त्यांनी फक्त सहा महिने बारामती लोकसभेचे खासदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी बारामतीमधून विधानसभा निवडणूक जिंकली आणि तेव्हापासून ते राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले होते.
नेहमीच सीएम इन वेटिंग राहिले अजित पवार...
बारामतीचे पत्रकार ज्ञानेश्वर रायते यांनी सांगितलं की, अजित पवार यांनी राजकीय सुरुवात छत्रपती साखर कारखान्यापासून झाली. काकांप्रमाणे कॉर्पोरेट सेक्टमध्ये त्यांनी कामाची सुरुवात केली. सुरुवातीपासून अजित पवारांच्या राजकारणात शरद पवारांची राजकारणाशी जोडलेली होती. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी सत्तेत असताना शरद पवारांनी अजित पवारांना महत्त्वाची खाती दिली. पण संधी असूनही त्यांना कधीही मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. अजित पवार नेहमीच मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करीत राहिले.
सर्वात मोठी पार्टी ठरली तरीही मुख्यमंत्रिपद दिलं नाही...
२००४ मध्ये काँग्रेस-एनसीपीचं आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं. शरद पवारांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती. शरद पवार यावेळी आपली निवड करतील अशी अजित पवारांना अपेक्षा होती. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. यानंतर सर्वांधाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाऐवजी शरद पवारांनी गृह, अर्थसारखी महत्त्वाची खाती घेतली. आणि त्यांनी केंद्रातील यूपीए सरकारमधील त्यांच्या कोट्यातून अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी केली. ही संधी हातातून गेल्याने अजित पवार खूप संतापले आणि त्यांनी अनेक वेळा त्यांची नाराजी जाहीर केली होती. यादरम्यान शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे या राजकारण सक्रिय होत होत्या. त्यावेळी शरद पवारांचा वारसदार म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं जात होतं, ज्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले.
भ्रष्टाचाराचं प्रकरण...
अजित पवार एकामागून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकू लागले. त्यांच्यावरील सर्वात मोठा आरोप म्हणजे ७०,००० कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा. हा १९९९ ते २००९ दरम्यान घडला, जेव्हा अजित पवारांवर सिंचन विभागाची जबाबदारी होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world