Ajit Pawar: सत्य जाणून घेण्याचा हक्क, अजित पवार अपघातप्रकरणी जय पवारांची पहिली प्रतिक्रिया;VSRबद्दल मोठी मागणी

Ajit Pawar Death News: अजित पवार विमान अपघात प्रकरणी त्यांचे पुत्र जय पवार यांनी पहिल्यांदाच आपली थेट भूमिका मांडत मोठी मागणी केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Jay Pawar Post: अजित पवार विमान अपघात प्रकरणी जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया"
Jay Pawar Instagram

Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्य अजूनही शोकसागरात बुडाले आहे. या भीषण विमान अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच, आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट शेअर करत आक्रमक भूमिका मांडलीय. "विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही," असे म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. जय पवार यांनी पोस्टमध्ये अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा फोटोही शेअर केलाय. 

व्हीएसआर (VSR) कंपनीवर बंदीची मागणी

जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये या दुर्घटनेबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे. Miss You Dad".

जय पवार यांनी थेट विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा: Rohit Pawar News: दादांचा अपघात आणि 200 पट ताकदीचं गुपित! रोहित पवारांचा 'त्या' नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप)

Photo Credit: Jay Pawar Instagram

'Miss You Dad' - काळजाला भिडणारी साद

आपल्या पोस्टच्या शेवटी जय पवार यांनी "Miss You Dad" असे लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. वडिलांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि त्यासोबतच या अपघाताभोवती असलेले संशयाचे धुके यामुळे पवार कुटुंबीय आणि समर्थक सध्या दुःखी आणि संतप्त दिसतायेत.