- विशाल पाटील, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत मिटकरी यांनी त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकी? | Pink Mali News
आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी (9 मार्च 2026) या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या आईची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ दिला. आमदार मिटकरी म्हणाले, "काही वेळापूर्वी मी पिंकी माळी यांच्या आईला भेटलो तेव्हा त्यांनी मला एक ऑडिओ ऐकवली. या प्रकरणाबाबत पत्रकारांसमोर जाऊन बोलू नका, अशी धमकी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे."
(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash Case: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली, विधान परिषदेत काय घडलं?)
व्ही. के. सिंग यांची नार्को टेस्ट करा : अमोल मिटकरी | Ajit Pawar News | V. K. Singh News
"व्ही. के. सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, व्ही.के सिंगची नार्को टेस्ट करा", अशी आक्रमक मागणी मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी नुकताच सीआयडीसमोर आपला जबाब नोंदवला आहे, ज्यात त्यांनी अपघाताचे खापर पायलट सुमित कपूर यांच्यावर फोडले आहे.
दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे देखील लवकरच पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिलीय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच थेट अंडरवर्ल्डचा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झालंय.