- जुई जाधव, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विधान परिषदेत आज सोमवारी या गंभीर विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना, ही चर्चा तीन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक, दोन्ही राष्ट्रवादी गट आक्रमक होण्याच्या शक्यतेमुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटलं जातंय. राज्यसभा निवडणूक आणि अर्थसंकल्पीय कामाचे कारण देऊन ही चर्चा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पायलटची चूक! व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा सीआयडीसमोर जबाब
दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या CID तपासादरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान सिंग यांनी धक्कादायक जबाब नोंदवला आहे.
"या अपघाताला पायलट सुमित कपूर याची चूक कारणीभूत आहे", असा जबाब व्ही. के. सिंग यांनी सीआयडीसमोर नोंदवला आहे. "अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा", असेही व्ही.के.सिंग यांनी म्हटलंय.
व्ही.के.सिंग यांनी दिलेल्या धक्कादायक जबाबामुळे प्रकरणास नवे वळण प्राप्त झालं आहे. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार आणि पुत्र जय पवार यांनी यापूर्वीच व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले असल्याने या जबाबाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन मागील भेटीच्यावेळी CID च्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण हा अहवाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसंच काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात… pic.twitter.com/S8cFPX70U8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026
रोहित पवार यांच्या तीन सोशल मीडिया पोस्टने खळबळ | Rohit Pawar News | VSR V.K Singh
व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट : रोहित पवार
AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन मागील भेटीच्यावेळी CID च्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण हा अहवाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसंच काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात आली, CID ऑफिसमध्ये एके-४७ सह त्याच्या सुरक्षा गार्डला परवानगी देण्यात आली, म्हणूनच आज पुन्हा CID च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली, परंतु आजही गुन्हा दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि फायनल रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचं नवीन आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं. याचा अर्थ व्ही. के. सिंग कुणाचंतरी नाव घेईल म्हणून त्याला वाचवण्यासाठी व्ही. के. सिंगला जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जात आहे का, असा आमचा प्रश्न आहे. पण कितीही वेळकाढूपणा केला किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सुरुच ठेवणार.!
व्ही. के. सिंगला नेमकी कुणाची भीती वाटते? : रोहित पवारज्याच्या विमान अपघातामुळं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग काल चौकशीसाठी CID कार्यालयात आला असता बघा त्याचे हे बंदुकधारी बॉडीगार्ड… हा जर धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे तर याला नेमकी कुणाची भीती वाटते? की हा स्वतःला एखादा जागतिक नेता समजतो?… pic.twitter.com/RcOKUfg5HS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026
ज्याच्या विमान अपघातामुळं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग काल चौकशीसाठी CID कार्यालयात आला असता बघा त्याचे हे बंदुकधारी बॉडीगार्ड… हा जर धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे तर याला नेमकी कुणाची भीती वाटते? की हा स्वतःला एखादा जागतिक नेता समजतो? पोलिसांच्याच विभागात आला असताना त्याला एवढी सुरक्षा का घ्यावी लागते? ज्याला CID कार्यालयात गाडी नेण्यास परवानगी दिली जाते आणि ‘‘मेरी ऊपर से नीचे तक पहुँच है'' अशी उद्दाम भाषा जो वापरतो, तो नेमका कोण लागून गेला?
तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… , रोहित पवार यांचा प्रफुल पटेलांवर निशाणाMr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world