Amol Mitkari: 'जस्टिस फॉर दादा...', अजित पवारांना न्याय देण्यासाठी अमोल मिटकरींची मोठी घोषणा

नाशिकचा भोंदू अशोक खरात आणि व्हीआरएस कंपनीचे लागे बांधे असून कंपनीचा मालक खरातचा भक्त असल्याचा मोठा दावा अमोल मिटकरींनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली:

Amol Mitkari On Ajit Pawar Accident:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.  नाशिकचा भोंदू अशोक खरात आणि व्हीआरएस कंपनीचे लागे बांधे असून कंपनीचा मालक खरातचा भक्त असल्याचा मोठा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्या न्यायासाठी  "जस्टिस फॉर दादा" संवाद यात्रा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. 

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?

"महाराष्ट्रात जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा"

अजितदादांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात 'जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा' काढण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या 14 मे जयंतीच्या दिवशी यात्रेला सुरुवात होणार असून प्रत्येक गावात जाऊन अजितदादा न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव देखील घेण्यात येणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते.

Advertisement

त्याचबरोबर भोंदूबाबा अशोक खरात याचा व्हीआरएस विमान कंपनीशी संबंध असून व्हीके सिंग हा खरातचा भक्त आहे,असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच कुणाच्या सांगण्यावरून अजितदादा विमानात बसले होते,खरात याच्या खात्यावर 25 कोटींचे झालेले ट्रांझेकशन,या सर्व गोष्टी गुलदस्त्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

'अन्यथा महाराष्ट्रात आगडोंब उसळणार'

अजितदादांच्या विमान अपघाताच्या निपक्षपाती चौकशीसाठी अजितदादा यांना न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदू खरात याचा 16 ते 31 नोव्हेंबर पर्यंतच्या सीडीआर काढावा, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेचा आगडोंब  उसळल्यास तो ईशान्येश्यश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आग पेटत जाणार,असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

Amravati News: अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट! 5 पोलीस कर्मचाऱ्यांना दणका, एसपींचा मोठा निर्णय