Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघातात मोठा ट्वीस्ट! सरपंचांचा खळबळजनक दावा, 'एक व्यक्ती उडी मारण्याचा...

वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला:

Amol Mitakari On Ajit Pawar Plane Accident:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांचा अपघात की घातपात? असा सवाल काही नेते उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादीचेच नेते अमोल मिटकरी यांनी पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्या अपघातावर शंका घेत महत्त्वाचे सवाल केले आहेत. याबाबतच आता मिटकरांनी केलेल्या नव्या दाव्याने या संपूर्ण प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी? 

अमोल मिटकरी यांनी सांगितलं की,  "घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील, तर त्याला ताकदीने उत्तर देण्यात आम्ही समाधानी असून परिणामांची चिंता केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?

मिटकरी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती उघड करताना सांगितलं की, सध्या दाखवला जात असलेला सीसीटीव्ही फुटेज हा घटनेच्या दिवशीचा नसून तब्बल तीन महिन्यांपूर्वीचा आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, कोण उपस्थित होतं, अजित पवार कोणते कपडे घालून गेले होते ? हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Advertisement

अकोला महापालिकेतील अपयशाबाबतही अमोल मिटकरी यांनी भाष्य केले. युतीत निवडणूक लढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी आल्याचे स्पष्टीकरण आपण अजित पवारांना दिलं होते.   पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणं महत्त्वाचं असून, येत्या काही दिवसांत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील, असा दावा त्यांनी केला.दरम्यान, मिटकरी यांनी आणखी एक नवीन इच्छा व्यक्त केली आहे. ‘लाडकी बहीण' योजनेला ‘अजित दादा लाडकी बहीण योजना' असं नाव द्याव अथवा एखाद्या कृषी योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Ajit Pawar News: शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचं काम! अजित पवारांचा अखेरचा फोन कॉल, मृत्यूआधी काय बोलले?