DCM Ajit Pawar Last Call Recording: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. २८ जानेवारीला बारामतीमध्ये उतरत असताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी विमान अपघाताच्या अगदी काही मिनीटाआधी केलेला कॉल सध्या समोर आला आहे. यामध्ये अजित पवार यांनी श्रीजित कदम यांच्याशी संवाद केला, तोच दादांचा अखेरचा कॉल ठरला.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या गावगाड्यातील जनतेची कामे करणारे लोकनेते होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले. अगदी अपघाताच्या काही मिनिटे आधीच त्यांचा चुलत पुतणे श्रीजित पवार यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. त्या फोन कॉलवरील संभाषण आता समोर आले आहे. माळी समाजाच्या उमेदवारीसंदर्भात या कॉल करण्यात आला होता.
काय झाला संवाद?
अजित पवार : आम्ही पण सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातो
श्रीजीत पवार : नाही दादा मला जे वाटलं ते बोललो
अजित पवार : माळी समाजाला सुपे गटातून जिल्हा परिषद मधून दिली आहे
सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे
श्रीजीत पवार : हो दादा तुम्हाला जे वाटत तो निर्णय घ्या...
दरम्यान, मी एका कामासाठी त्यांना फोन केला होता. विमानात असताना सुद्धा त्यांना मेसेज मिळताच त्यांनी मला फोन केला. एक विषय होता त्याबाबत आम्ही बोलत होतो.बाबा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जात आहोत तू निवांत रहा आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार हे शेवटच्या श्वासापर्यंत सर्व जाती धर्मासोबत होता हेच मला सांगायचं होते, असं श्रीजित पवार म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world