Ajit Pawar: 'गांजा पिऊन रिपोर्ट बनवला..', DGCAच्या अहवालावर संताप, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा इशारा

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला:

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash Death:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागे संशयाचे धुके दिवसेंदिवस दाट होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी डीजीसीएने २२ पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालावरुनही राष्ट्रवादीचे नेते संशय व्यक्त करत आहेत. अशातच जय पवार यांनी व्हीएसआरचा मालक रोहित सिंग हा पायलटच्या सीटवर डुलकी घेत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरुन आमदार अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त केला आहे. 

व्हीएसआरचा रिपोर्ट सदोष.. अमोल मिटकरी संतापले! 

अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  VSR कंपनी संदर्भातील वाद आणखी तीव्र झाला आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar: VSRच्या मालकाचं विमानातील धक्कादायक कृत्य, जय पवारांनी जीवघेण्या निष्काळजीपणाचा Videoच आणला समोर

DGCA चा २२ पानी प्राथमिक अहवाल अत्यंत सदोष असल्याचा आरोप करत, त्यामध्ये ठिकाणांच्या उल्लेखात विसंगती असल्याचे त्यांनी नमूद केले. हा अहवाल दारू किंवा गांजा पिऊन बनवल्या सारखा असल्याचं दिसतोय, असा घणाघात आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. हा प्राथमिक अहवाल अत्यंत सदोष आहे. जिल्हा बारामती म्हटलं आहे, विमान झाडाला धडकल्याचे सांगितले आहे, या रिपोर्टला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले. 

रोहित सिंगला अटक करा

यादरम्यान, रोहित सिंह उड्डाणादरम्यान झोप घेत असल्याचा आरोप गंभीर असल्याचे सांगत, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे मिटकरी म्हणाले. रोहित सिंह मुजोर आणि माजोरडा असेल तर त्याला तात्काळ अटक करावी तसेच VSR कंपनीवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. जय पवार यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. DGCA ने तातडीने कठोर कारवाई न केल्यास संबंधित कंपनीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही मिटकरी यांनी दिला.

Advertisement

Ajit Pawar : आधी झाडाला धडक अन् मग विमानाचा गोळा, वाचा अजित पवारांच्या अपघाताचा अंगावर काटा आणणारा अहवाल !