जाहिरात

Ajit Pawar: VSRच्या मालकाचं विमानातील धक्कादायक कृत्य, जय पवारांनी जीवघेण्या निष्काळजीपणाचा Videoच आणला समोर

Ajit Pawar News: अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची भावुक पोस्ट; वडिलांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत DGCA कडे केली मोठी मागणी.

Ajit Pawar: VSRच्या मालकाचं विमानातील धक्कादायक कृत्य, जय पवारांनी जीवघेण्या निष्काळजीपणाचा Videoच आणला समोर
"Ajit Pawar Death: जय पवार यांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ"
Jay Pawar Instagram

Ajit Pawar Death News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर व्हीएसआर कंपनीशी संबंधित पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा धक्कादायक व्हिडीओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. जय पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, "माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो - या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी..." हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करत शेअर जय पवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

ही वेदना आयुष्यभर साथ देणार: जय पवार

जय पवार यांनी आपल्या पोस्टची सुरुवात अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत केलीय. त्यांनी म्हटले की, "माझ्या वडिलांना आपण गमावले... ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे." पितृछत्र हरपल्याचे दुःख व्यक्त करतानाच त्यांनी विमान अपघातास कारणीभूत ठरू शकणाऱ्या तांत्रिक आणि मानवी त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar : आधी झाडाला धडक अन् मग विमानाचा गोळा, वाचा अजित पवारांच्या अपघाताचा अंगावर काटा आणणारा अहवाल !)

रोहित सिंहवर गंभीर आरोप 

जय पवार यांनी या व्हिडीओचा संदर्भ देत VSR कंपनीचे मालक रोहित सिंहवर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये रोहित सिंह उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू कसा शकतो? हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, अशा शब्दांत जय यांनी आपला संताप व्यक्त केला. विमान प्रवासातील अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप लोकांना धोका निर्माण होऊ शकतो, ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जय पवार यांची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी देखील जय पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com