Ajit Pawar's post on female pilots : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झालं. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी महिला पायलटबाबत टिप्पणी केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांची ती पोस्ट चर्चेत आली आहे.
महिला पायलटसंदर्भात केली होती पोस्ट...
अजित पवारांनी १८ जानेवारी २००४ साली आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक्सवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी लिहिलं होतं, जेव्हा आम्ही हेलिकॉप्टर किंवा विमानातून प्रवास करतो आणि जर आमचं विमान सुरक्षितपणे लँड झालं, याचा अर्थ सारथ्य़ एका महिला पायलटकडे असल्याचं समजतो. सध्या अजित पवार यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
अजित पवारांचं विमान कोण चालवत होतं?
अजित पवार ज्या खासगी विमानातून बारामतीला जात होते, त्यांच्या विमानाचे पायलट सुमीत कपूर होते. त्यांना १५ हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. या विमानाची कोपायलट शांभवी पाठव होत्या. शांभवी यांनी न्यूझिलँड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांना तिथल्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून (CAA) व्यावसायिक पायलट परवानाही मिळाला. त्याशिवाय भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) त्यांना व्यावसायिक पायलट परवानाही मिळाला होता. त्यांच्या मृत्यूने विमान वाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.