Ajit Pawar: द्राक्ष शेतीत नवी क्रांती अन् अजित पवारांचे नाव; दादांना आगळीवेगळी श्रद्धांजली; पाहा VIDEO

नव्या द्राक्षाच्या वाणाला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देऊन अजितदादांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, इंदापूर:

Indapur Tribute To Ajit Pawar:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पवार यांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजना तसेच बारामती विमान तळाला त्यांचे नाव द्या अशी मागणी होत आहे. अशातच आता इंदापुरमध्ये अजित पवार यांना आगळी वेगळी श्रद्धांजली देण्यात आली असून द्राक्षाच्या नव्या वाणाला त्यांचे नाव देण्यात आलं आहे. 

द्राक्षाच्या वाणाला अजित पवारांचे नाव!

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेलीत जैविक निविष्ठा प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले असून याच वेळी द्राक्ष शेतीत निवड पद्धतीने नवा वाण निर्माण करण्यात आला असून अजित सीडलेस असं या नव्या वाणाचं नामांकरण करण्यात आले आहे. निवड पद्धतीनं निर्माण करण्यात आलेल्या या नव्या द्राक्षाच्या वाणाला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देऊन अजितदादांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Jalgaon News: जळगावात ठाकरे गटाला खिंडार! बडा नेता हाती घेणार 'धनुष्यबाण'; 6 मार्चला जाहीर प्रवेश

यावेळी बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉक्टर कौशिक बॅनर्जी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर राजीव मराठे, सिडकोचे सह संचालक दिलीप ढोले,श्रीराज भरणे आणि महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र वाघमोडे  यांची उपस्थिती होती.  हा वाण रोगास कमी बळी पडतो,निर्यातक्षम द्राक्षे निर्माण होतात,तिन्ही हंगामात हा वाण चांगले उत्पादन देतो.पाच वर्षे या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हा वाणाचे घड 300 ग्रॅम पेक्षा अधिक निघतात,आखाती देशात याला मागणी देखील आहे.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार'

दरम्यान, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार' यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  "महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली" असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Advertisement

Lunar Eclipse: भाविकांनो लक्ष द्या! चंद्रग्रहणामुळे शेगाव, पंढरपुर मंदिर दर्शनात मोठा बदल; 'ही' देवस्थाने बंद