संकेत कुलकर्णी, अकलुज:
Akluj nagar palika election Result Bet: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज्यभरातील २६४ नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारासह कार्यकर्त्यांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. अशातच आता नगराध्यक्ष कोण होणार? यावरुन अकलूजमध्ये चक्क बुलेटची पैज लागल्याचे समोर आले आहे.
नगराध्यक्ष कोण होणार?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकलूज मध्ये होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे. अकलूजमध्ये राष्ट्रवादीचे मोहिते पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या राम सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला आहे. भाजपकडून पूजा कोथमीरे, तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत.
Purandar Airport: ठरलं तर! पुरंदर विमानतळ मोबदल्याबाबत मोठी अपडेट, शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय?
याच दोन्ही उमेदवाराबाबत दादा तरंगे यांनी भाजपासाठी तर मच्छिंद्र करणावर यांनी मोहिते पाटील अर्थात राष्ट्रवादीच्या विजयासाठी थेट बुलेटची पैज लावली आहे. विशेष म्हणजे अकलूजमध्ये झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर बुलेट सारख्या पैजा लागल्याने अकलूजच्या निकालाची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचवत आहेत. दोन्ही मित्रांनी लावलेल्या या पैजेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मित्रांमध्ये लागली पैज!
या व्हायरल व्हिडिओमध्ये, अकलुजमध्ये तुतारीचाच नगराध्यक्ष होणार असा दावा मच्छिंद्र कर्णवर यांनी केला आहे. तर दादा तरंगे यांनी 21 तारखेला कमळाचा नगराध्यक्ष होणार असा दावा केला आहे. पैज हारल्यास बुलेट गाडी देण्याचे आश्वासनही या दोन्ही मित्रांनी दिले आहे. त्यामुळे ही पैज नेमकी कोण जिंकणार अन् बुलेट कोणाला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Navi Mumbai News: APMC मार्केटमध्ये अजब घोटाळा! चक्क सर्विस रोड भाड्याने दिला? तुर्भे परिसरात खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world