योगेश शिरसाट, अकोला
Akola Crime News : डिजिटल युगात ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईट्सवर लग्न जमवणे सामान्य झाले आहे. मात्र, या विश्वासाच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून शिक्षिकेची फसवणूक आणि समाजाच्या नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुर्तीजापूर येथील 29 वर्षीय एका शिक्षिकेवर आरोपी स्वप्नील भिसे यांनी लग्नाचे स्वप्न दाखवत धोका दिला. आरोपीने प्रेमाचे नाटक करत 28 एप्रिल रोजी आपल्या जालना येथील घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्नास संपूर्णपणे नकार दिला. या घटनेने फक्त शिक्षिकेच्या आयुष्याला नव्हे, तर तिच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
त्यानंतर शिक्षिकेच्या तक्रारीनुसार मुर्तीजापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करत आहेत. सदर प्रकरणाचा तपास पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी जालना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
(नक्की वाचा :तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा महागात पडला; उदयपूरच्या मार्बल व्यापार्यांनी 5000 कोटींचे व्यवहार मोडले)
दरम्यान या घटनेने समाजातील महिलांनी होणारी फसवणूक आणि शारीरिक शोषण या घटना अधोरेखित होत आहेत. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवावा, तर समाजाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जबाबदारीची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.