योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात पावसाने चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्हाभरात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.. या पावसामुळे बऱ्याच नदी नाले होऊ लागले तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात जलाशयाची पातळी वाढली.. तर दुसरीकडे याच पावसाने काल दिनांक (16 जुलै) रोजी तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे शेतातील नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यामध्ये शेतातून घरी जाण्यासाठी निघालेल्या 80 वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्याचा वाहून मृत्यू झाला आहे.
अकोल्याच्या तेल्हारातील दहिगाव अवताडे शेतशिवार परिसरात ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. विनायक पुंडलिकराव अवताडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पावसामुळे अनेक धरणात जलाशयाची पातळी वाढली असून नदी-नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दहिगाव अवताडे शेतशिवार परिसरात असलेल्या एका नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा वाहत आला. यातच 80 वर्षीय शेतकरी विनायक पुंडलिकराव अवताडे वाहून गेले काही अंतरावर त्यांचा मृतदेह मृत अवस्थेत गाव शिवारातच मिळून आला. त्यामुळे गावात एकच शोक कडा पसरली आहे.
(नक्की वाचा : Akola: अकोल्यात ड्रग्जचं जाळं विणणारा 'गब्बर' फरार, पोलिसांवर पैसे उधळणाऱ्या आरोपीचा 'आका' कोण? )
अल्पभूधारक शेतकरी विनायक अवताडे यांचे दहिगाव शेतशिवार चार एकर शेती असून ते शेतात फेरफटका मारून मशागतीचे काम उरकून घराकडे निघाले. दुपारच्या सुमारास यावेळी शेत परिसरातल्या नाल्याला पाण्याचा मोठा प्रमाणात लोंढा आणि नाला ओसंडून वाहू लागला. त्यावेळी नाल्यातून वाट काढत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वृद्ध शेतकरी अवताडे वाहून गेले.
वृद्ध अल्पभूधारक शेतकरी विनायक अवताडे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करून आपला प्रपंचाचा गाडा ओढत होते. आज सकाळी (गुरुवार, 17 जुलै) 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह नाल्याच्या प्रवाहात वाहून एक किलोमीटर अंतरावर तेल्हारा दहिगाव शेतशिवार परिसरातच आढळून आला.. यंदा विनायकराव यांनी चार एकर शेतामध्ये सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली होती.. आता मात्र विनायकरावांच्या जाण्याने दहिगाव अवताडे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं नातवंड असा परिवार आहे.