योगेश शिरसाट
अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. असं असताना एक लग्न भर पावसात लावलं गेलं. पाऊस हा आपल्यासाठी आशिर्वाद आहे अस समजून वधू वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्न पावसातच आवरण्याचा निर्णय घेतला. हा लग्नविधी सोहळा अकोल्याच्या अशोक वाटिका येथे आज दुपारी रिपरीप पावसात पार पडला. गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. ऐन मे महिन्यात पाऊस होत असल्याने काही अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पण त्या आधी अवकाळी पावसाने राज्यात अनेक भागांना झोडपून काढलं आहे. अवकाळीमुळे काही ठिकाणी शेतीचं ही नुकसान झालं आहे. ऐन मे महिन्यात हा पाऊस होत असल्याने अनेकांची धांदल ही उडाली आहे. शिवाय हा सिजन लग्नाचा ओळखला जातो. ऐन लग्न सराईत पाऊस पडत असल्याने अनेक लग्न ही दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या अनेक घटना ही समोर आल्या आहे. पण अकोल्यातलं लग्न मात्र त्याला अपवाद ठरलं आहे.
अकोला शहरातल्या शिवनी येथील वधू- वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून पावसातचं लग्न उरकलं. वधूच्या गळ्यात मंगळसुत्र बांधून भर पावसात पत्नी म्हणून वराने स्वीकार केला. हा विवाह सोहळा बौद्ध रितीरिवाज प्रमाणे विधीवत पार पडला. यावेळी दोघांनीही एकमेकाला पती-पत्नी म्हणून स्वीकार केलं.
दरम्यान वधू साक्षीच्या लग्नाला चक्क निसर्गा'नेच साक्ष दिली. साक्षी आणि स्वप्नीलच्या लग्नात मेघगर्जने'ने त्यांच्या विवाहाचे स्वागत केले. या दरम्यान, अकोल्याच्या अशोक वाटिका मध्ये पार पडलेल्या या लग्नविधी'मुळे सर्व ठिकाणी विवाहाची चर्चा होत आहे. लग्ना'तील वऱ्हाडी ही पावसात यावेळी भिजली. पावसाचं रुप पाहात लग्न ही दहा मिनिट लावण्यात आलं. साक्षी आणि स्वप्निल यांनी पाऊस असला तरी काही हरकत नाही पावसातच लग्न करुयात असं मन बनवलं होतं. या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.