काँग्रेसला नवा राज्य प्रदेशाध्यक्षपद मिळणार? अमित देशमुख दिल्लीला रवाना

नाना पटोले राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (State Congress President) दारूण पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली उभारी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकू शकली नाही. परिणामी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - 'मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही', अजित पवारांनी केलं स्पष्ट

नाना पटोले राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात विधानसभेमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याचा स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देणार असल्याची चर्चेनंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने अमित देशमुख लातूरहून मुंबईकडे तातडीने विमानाने रवाना झाले आहेत. 
 

Advertisement

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world