सुजीत आंबेकर, सातारा
महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागां जिंकून महाविकास आघाडीला सुपडा साफ केला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आता मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरु आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची प्रमुख दावेदार आहेत. कारण भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या आमदारांकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे दावे केले जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरवण्यात आलेला नाही. आम्ही तिघे एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊन. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी कालच निवड झाली आहे. एकनाथ शिंदे यांची देखील गटनेतेपदी निवड झाली आहे. भाजपमध्येही हीच प्रक्रिया पार पडेल. आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून वरिष्ठांशी चर्चा करून राज्याला मजबूत असे स्थिर सरकार देऊ. राज्यातील जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)
सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार- अजित पवार
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती नाही. आम्ही तिघे एकत्र बसून राज्याला स्थिर सरकार देऊ. आमच्याकडे बहुमत आहे, विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारे संख्या बळ देखील विरोधकांकडे नाही. मात्र विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर कसे राहील ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील अजित पवारांनी दिली.
(नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक)
विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपांना उत्तर
ईव्हीएम घोटाळ्याबाबतच्या विरोधकांच्या आरोपांवर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, ज्या राज्यात त्यांचे सरकार आले तिथे त्यांना ईव्हीएम घोटाळा दिसला नाही. मात्र ज्या राज्यांमध्ये त्यांचा पराभव झाला तेथे त्यांनी आरोप केले आहेत. ईव्हीएम घोटाळ्याचे काहीच कारण नाही. निवडणुकीतील यश मतदारांच्यावर अवलंबून असतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world