विधानसभेच मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शनिवारपासून शिर्डीत भाजपचा महाविजय प्रदेश अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष आणि मोर्चा प्रदेश अध्यक्षांमध्ये बैठक पार पडली. यावेळी बैठकीत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश संघटन पर्व प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिर्डी येथे होत असलेल्या महाअधिवेशनात आज पंधरा हजार कार्यकर्ते हजर राहणार आहेत. भाजपची संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढावं की कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश द्यावे यासंदर्भात देखील महाअधिवेशनात चित्र स्पष्ट होईल. भाजपचं पालिका मिशन काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.