जाहिरात

Amol Mitkari: 'अजित पवारांचीही राजीव गांधींप्रमाणेच..', अमोल मिटकरींचे 5 गंभीर प्रश्न, आरोपांनी खळबळ

पायलट साहिल मदन व यश हे २८ जानेवारीला सकाळी पाच पासुन कुणाच्या संपर्कात होते याचा CDR जरी काढला तरी बरच चित्र क्लीयर होईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Amol Mitkari: 'अजित पवारांचीही राजीव गांधींप्रमाणेच..', अमोल मिटकरींचे 5 गंभीर प्रश्न, आरोपांनी खळबळ

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Accident:  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून या अपघाताबाबत नवनवे दावे केले जात असून हा अपघात नसून घातपात असल्याचा थेट आरोप होत आहे. अशातच आता अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरुन सर्वात खळबळजनक दावा केला आहे. 

अजित पवारांचीही राजीव गांधींप्रमाणे हत्या?

अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन अमोल मिटकरी यांनी सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? असा संशय अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील पारस फाटा  'मुरलीधर राऊत मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या आणखी एका लोकप्रिय योजनेला ब्रेक! ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न भंगलं

पायलट सुसाईड बॉम्बर?

"पालयट कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधी यांची हत्या लिट्टेच्या सुसाईड बॉम्बरने केली होती. तसा हा सुसाईड बॉम्बर नसावा हे कशावरून? कुठाय कपूर ? कपूरची बायको दुसऱ्या दिवशी पोस्ट लिहिते की माझा नवरा जिवंत आहे. डीजीसीए म्हणते की 6 माणसे होती, मग एक माणूस गेला कुठे ? वेळेवर बदलले गेलेले पायलट कुठे आहेत?" असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच दादांच्या विमानासाठी नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट त्यादिवशी कुठे अडकले होते व आता कुठे आहेत बस इतकीच माहिती मिळावी.ब्लॅक बॉक्स चा डेटा रिकव्हर झाल्यावर मिळाला तरी हरकत नाही. पायलट साहिल मदन व यश हे २८ जानेवारीला सकाळी पाच पासुन कुणाच्या संपर्कात होते याचा CDR जरी काढला तरी बरच चित्र क्लीयर होईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Bhandara News:मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार! कंत्राटदार तुपाशी, शेतकरी उपाशी, प्रकरण काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com