जाहिरात

Chikhaldara Accident: चिखलदऱ्यात मोठी दुर्घटना! पर्यटकांची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली, मध्यरात्री थरार

  अमरावतीच्या चिखलदऱ्याहून परतताना शहापूरजवळ ही घटना घडली. अपघातानंतर बचावपथकाने सर्वांना सुखरुपणे बाहेर काढले. 

Chikhaldara Accident: चिखलदऱ्यात मोठी दुर्घटना! पर्यटकांची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली, मध्यरात्री थरार

शुभम बायस्कार, प्रतिनिधी:

Chikhaldara Car Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत.  अमरावतीच्या चिखलदऱ्याहून परतताना शहापूरजवळ ही घटना घडली. अपघातानंतर बचावपथकाने सर्वांना सुखरुपणे बाहेर काढले. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. मध्ये चार जण जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. या सहा जणांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांसह जिल्हा शोध व बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठत रीत उतरून कारमधील सहाही जणांना बाहेर काढले.

'मुंबई-पुणे एक्सप्रेस'वे वर अनियंत्रित कंटेनरनं BMW, मर्सिडीजसह 20 वाहनं चिरडली, पाहा भीतीदायक Video

 नईम सलाम (32, रा. अमरावती), सलमान खान लियाकत खान (35, अमरावती),  सलीम अ. सलाम (35, रा. वदहतनगर, अमरावती), अशहर मिरान मो. रफिक (31, रा. अमरावती) यांच्यासह दोन चिमुकले असे एकूण सहा जण कारने चिखलदरा येथून घटांग मार्गे अमरावतीकडे निघाले होते. हे सर्व पर्यटक चिखलदरापासून दोन किलोमीटर अंतरावरील शहापूर गावासमोर सेल्फी पॉइंटजवळ पोहोचले होते. 

त्यावेळी अचानक त्यांची कार थेट दरीत चारशे ते साडेचारशे फुट खोल कोसळली. ही बाब तेथे उभ्या असलेल्या दोन तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. चिखलदराचे ठाणेदार चिखलदराचे ठाणेदार प्रशांत मसराम, एपीआय प्रवीणकुमार पाटील यांनी तातडीने जिल्हा शोध व बचाव पथकांच्या जवानांसह घटनास्थळ गाठले.

(नक्की वाचा : Navi Mumbai : खारघर पांडवकडा धबधब्यावर जीवघेणा थरार, अग्निशमन दलानं वाचवले तरुणाचे प्राण )

जवानांनी जीवाची पर्वा न करता दोराच्या सहाय्याने दरीत उतरण्याचे धाडस केले. यावेळी जवानांनी एक तास शर्थीच्या प्रयत्नानंतर सहाही जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना तत्काळ चिखलदरा येथील रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत एकाला पायाला फॅक्चर झाले असून, उर्वरित तिघांना मार लागला आहे. या चौघांनाही अमरावतीला पाठवण्यात आले. उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com