जाहिरात
Story ProgressBack

महाराष्ट्राचा सातासमुद्रापार डंका! अमरावतीकरांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नोंदवला रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात पार पडलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमरावतीकरांनी आपल्या राज्याचे नाव सातासमुद्रापार उंचावले आहे.

Read Time: 2 mins
महाराष्ट्राचा सातासमुद्रापार डंका! अमरावतीकरांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नोंदवला रेकॉर्ड

Comrades Marathon 2024 : धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात 9 जून रोजी पार पडली. या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटू देखील सहभागी झाले होते. पण अमरावतीतील धावपटूंनी सलग 11 तास धावून 90 किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे-बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत पदक पटकावले.

(नक्की वाचा : इटलीच्या पंतप्रधानांच्या पक्षाचा EU च्या संसदीय निवडणुकीत मोठा विजय, जॉर्जिया मेलोनी ठरल्या 'किंगमेकर')

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सहा टप्पे असतात. हे सर्व टप्पे स्पर्धकांना ठराविक वेळेमध्ये पूर्ण करावे लागतात. 90 किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांनाच पदक दिले जाते. ही जगातील सर्वात कठीण आणि खडतर समजली जाणारी 90 किलोमीटर अंतराची कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा अमरावती येथील दिलीप पाटील यांनी तब्बल आठ वेळा पूर्ण केली आहे. 

(नक्की वाचा: अमेरिकेच्या विजयात चमकणारा, कोण आहे सौरभ नेत्रावळकर?)

दरम्यान या स्पर्धेमध्ये भारतातून एकूण 323 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी सहा धावपटू हे अमरावतीतील होते. वर्ष 2O23मध्ये दिलीप पाटील आणि दीपमाला साळुंखे- बद्रे असे दोन जण सहभागी झाले होते. पण यंदा पहिल्यांदाच अमरावती सारख्या शहरामधून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी एकूण सहा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 

(नक्की वाचा: IND Vs PAK: अमेरिकेतील सामना पाहण्यासाठी ट्रॅक्टर विकला, सामना हरल्यानंतर पाकिस्तानी चाहता म्हणाला...)

नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी मकालु शिखर केलं सर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पानसरे कुटुंबाचं ATS कडे लेखी निवेदन, सनातन संस्थेवर कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त
महाराष्ट्राचा सातासमुद्रापार डंका! अमरावतीकरांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नोंदवला रेकॉर्ड
Man killed due to reel in kolhapur crime news
Next Article
कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला
;