Amravati News: नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट, 25 दिवस आरामाचा सल्ला, नक्की काय घडलं?

डॉक्टरांनी त्यांना 25दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना खाजगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. हे रुग्णालय नागपूरला असून त्यांच्यावर तिथे उचपार केले जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना 25दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी नवनीत राणा यांच्या पायाला इजा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रक्रीया केली जाणार आहे. 

नवनीत राणा यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिली होता. संपूर्ण अमरावती लोकसभा मतदार संघ त्यांनी पिंजून काढला होता. या निवडणूक प्रचारावेळी त्यांच्या पायाला इजा झाली होती. त्यातूनही त्यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला होता. लोकसभा निवडणूक झाली. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. पण त्यांनी योग्य उपचार घेतले नाहीत. 

नक्की वाचा - Navneet Rana: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

त्यामुळे त्यांचे पायाचे दुखणे हे वाढतच चालले होते. शेवटी पायाचा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या दुखापत झालेल्या पायावर शस्त्रक्रीया केली जाणार आहे. या दुखण्यामुळे त्यांच्या पायाला गाठ आली आहे. त्यावरच ही शस्त्रक्रीया केली जाईल.  त्यासाठी त्यांना 25 दिवस आराम करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शस्त्रक्रीयेनंतर सार्वजनिक कार्यक्रमापासून नवनीत राणा या दुर राहातील. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

 दरम्यान काही दिवसापूर्वी नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले होते. त्यात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत अमरावती पोलीसात तक्रारही दाखल करण्यात आली. ही धमकीचे पत्र हैदराबादहून आले होते. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. यापूर्वी ही राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ही राणा या राजकारणात आणि मतदार संघात कार्यरत आहेत.